Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वधारले; जाणून घ्या लेटेस्ट रेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारामध्ये (Indian Bullion Market) सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सातत्याने बदल होत असतो. सलग तीन सत्रात दोन्ही धातू महागले असल्याचं समोर आलं आहे. काल सोन्याचा दर 47,640 रुपये होता. आज मात्र सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाल्याचं दिसून येत आहे. तसेच, चांदीच्या दरातही तेजी आली आहे. आज (शनिवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,750 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 62,150 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे. सलग तीन सत्रात दोन्ही धातू महागले असल्याचं समोर आलं आहे.

 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange-MCX) आज शनिवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,750 रुपयांपर्यंत वाढला आहे. त्यामध्ये किरकोळ वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 62,150 रुपयापर्यंत ट्रेड करत आहे. त्यामध्येही आज तेजी दिसून येत आहे. मागील आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) साधारण वाढ दिसून येत आहे. तसेच दुसरीकडे लग्नसराई सीझन असल्याने दागिन्यासाठी मागणी देखील वाढताना दिसत आहे. दरम्यान, मुख्य शहरातील आजचा सोन्या-चांदीचा भाव जाणून घ्या.

 

आजचा सोन्याचा दर –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,090 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 62,150 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 28 may 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा