Gold Silver Price Today | खूशखबर ! आजही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नववर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात घसरण सुरुच आहे तर चांदीच्या दरातही घट दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सोन्या चांदीचा दर कमीच आहे. आज (मंगळवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,610 रुपये पर्यंत आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 60,400 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचा दर (Gold Silver Price Today) उतरत आहे. त्यामुळे सोनं स्वस्त झालं आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना योग्य संधी आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. त्यामुळेच सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकाची गर्दी देखील दिसून येत आहे. गतवर्षीची तुलना करता यंदा सोन्याचा दर कमी आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 45,850 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,650 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 46,610 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,610 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 46,610 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,610 रुपये

आजचा चांदीचा दर – 60,400 रुपये (प्रति किलो).

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 11 january 2022 sonya chandi che dar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये,
18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण

 

Deltacron Corona Variant | कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’ दाखल; डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र मग…