Gold Silver Price Today | सोन्याचा भाव ‘जैसे थे’ तर चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. गेली दोन दिवस सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आज सोन्याचा भाव जैसे थे तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज (बुधवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,090 रुपये आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 61रुपये पर्यंत पोहचली आहै.

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या चांदीचे दर आता वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या सोने आणि चांदीचे दर वधारले असल्याचं समोर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,320 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,840 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,090 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,090 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,090 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,090 रुपये

आजचा चांदीचा भाव – 61,700 रुपये (प्रति किलो)

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 19 january 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या