Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात किंचित घट, चांदी ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस झाले सोन्याच्या किमतीत चढउतार दिसून आली. मात्र, आज सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली असून चांदीचा भाव स्थिर असल्याचे दिसत आहे. आज (बुधवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) प्रति तोळा 49,850 रुपये आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 70,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

 

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात चढउतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आज सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,460 रुपये

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,460 रुपये

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,380 रुपये

आजचा चांदीचा दर – 70,000 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 20 april 2022


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा