Advt.

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीचे भावही वधारले; जाणून घ्या नवीन दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घट झाली. दरम्यान मागील दोन ते तीन दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आज (गुरूवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,160 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 63,200 रुपये पर्यंत पोहचली आहै.

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या चांदीचे दर आता वाढताना दिसत आहेत. सध्या सोने आणि चांदीचे दर वधारले असल्याचं समोर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज चांदीच्या भावात वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा दर –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,400 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,920 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,160 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,160 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,160 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,160 रुपये

आजचा चांदीचा भाव – 63,200 रुपये (प्रति किलो)

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 20 january 2022

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय
सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे