Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित घट; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या – चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान त्यानंतर आज सोन्या चांदीच्या किंमतीत किंचित घसरण झाली आहे. आज (गुरूवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,340 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 68,500 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.

 

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचं दिसून येत होतं. मात्र, सध्या सोन्या – चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांची बाजारात गर्दी दिसून येत होती. तरीही सध्या सोनं 50 हजाराच्या आतमध्ये आहे. त्यामुळे ग्राहकही सोनं खरेदी करण्यास पसंदी देत आहेत. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा दर –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,410 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,730 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,390 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,710 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,340 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,660 रुपये

आजचा चांदीचा दर – 68,500 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 24 march 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा