Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या किंमतीत किंचित घसरण; जाणून घ्या लेटेस्ट रेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) वाढ होत असल्याचं पाहायला मिळते. भारतीय सराफा बाजारात सोन्या -चांदीच्या दरात सतत बदल होताना दिसत आहे. दरम्यान, सध्या सोन्या – चांदीच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज (मंगळवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,950 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 68,400 रुपये पर्यंत पोहचली आहे.

 

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) वारंवार बदलत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ दिसून आली. पुन्हा त्यामध्ये घसरण झाली आहे. तर, जवळपास सोनं 50 हजाराच्या आत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध आहे.

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,050 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,400 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,980 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,340 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 53,310 रुपये

आजचा चांदीचा दर – 68,400 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 29 march 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा