Gold Silver Price Today | खुशखबर ! आजही सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या दोन महिन्यापासून सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण होताना दिसत आहे. आज नववर्षाच्या तिस-या दिवशीही सोनं-चांदी स्वस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,170 रुपये पर्यंत आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 62,400 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Price Today) उतरताना दिसत आहे. यामुळे सोने-चांदी स्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. त्यामुळेचं सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकाची गर्दी दिसून येतेय. सोनं स्वस्त झाल्याने सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा दर –

पुणे

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,570 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,100 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,170 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,170 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,170 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,170 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,400 रुपये (प्रति किलो).

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 3 january 2022 sone chandi dar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती; कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार; इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख, जाणून घ्या काय आहे प्लान