Gold Silver Price Today | सोन्याच्या भावात घसरण तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण (Gold Silver Price Today) होताना दिसत आहे. त्यामुळे सणात आणि सध्या असणाऱ्या लग्नसराईत सोन्याचा दर कमी आहे. आज (बुधवारी) सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,820 रुपये आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) सध्या 61,900 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

ग्राहकांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सध्या योग्य संधी उपलब्ध झाली आहे. आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold Price) घट तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या कालावधीत सोनं स्वस्त झालं आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव कमी आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात (MCX) वर सोन्याचा भाव पन्नास हजाराच्या वर होता. यंदा तोच भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. (Gold Silver Price Today)

आजचा सोन्याचा दर – (Gold Price)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,090 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 49,320 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 46,820 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,820 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 46,820 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 47,820 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 61,900 रुपये (प्रति किलो).

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 8 december 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Anti Corruption Bureau Maharashtra | 10 लाखाचे लाच प्रकरण ! पोलिस अधिकाऱ्यासह तिघे अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलिस दलात खळबळ

Sanjay Raut | शिवसेना UPA मध्ये सहभागी होणार? राहुल गांधींच्या भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले…

Pune Crime | पुण्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता आणि बांधकाम व्यावसायिक समीर उर्फ लालबादशाह खून प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी