Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | एकीकडे लग्नसराई संपत येत आहे. तर दुसरीकडे सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण (Gold Silver Price Today) झाली आहे. आज (गुरूवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,500 रुपये आहे. तसेच, 24 कॅरेट सोन्याचा दर 51,820 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 60,600 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

 

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओच्या माध्यमातून (Indian Standards Organization) हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट वर 999, 23 कॅरेट वर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेलं असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तसेच, काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा अधिक विकले जाते. कॅरेट जितके अधिक असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जातेय.

 

24 कॅरेट सोन्याचा भाव – 

मुंबई – 51,810 रुपये

नागपूर – 52,860 रुपये

पुणे – 52,860 रुपये

दिल्ली – 51,810 रुपये

चेन्नई – 51,700 रुपये

हैदराबाद – 51,810 रुपये

कोलकात्ता – 51,810 रुपये

लखनऊ – 51,960 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate price todays update

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा