पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Gold-Silver Price Today | सण असो अथवा समारंभ प्रत्येकाला सोने परिधान करणे नेहमीच आवडत असते. पुणे येथील बाजारपेठ हे सोने खरेदीसाठी भारतभर प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सोन्याच्या किमतीत घसरण होताना दिसत होती. सोन्याचे अर्थव्यवस्थेत फार मोलाचे स्थान आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने हे बेस्ट ऑप्शन समजले जाते. (Gold-Silver Price Today)
सोन्याचे दर हे दररोज बदलत असतात. आपण जाणून घेऊयात पुण्यातील सोन्याचे आजचे भाव. 9 मार्च म्हणजेच कालपर्यंत 24 कॅरेट सोन्याचे दर 56553 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर 51841 इतका होता. तर आज 24 कॅरेट सोन्याचा दर 57011 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 52260 एवढा आहे. (Gold-Silver Price Today)
मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण सुरू होती. त्या घसरणीला आता थोडा ब्रेक लागला असून
आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज एक ग्रॅम 24 कॅरेटच्या सोन्याचा भाव 5701 तर एक ग्रॅम 22 कॅरेट
सोन्याचा भाव 5226 इतका आहे. तर आज पुण्यातील चांदीचा दर हा 67000 हजार रुपये प्रति किलो आहे. पुणे शहरातील आजचे सोन्याचे भाव सर्वसाधारण आहेत. सोन्याच्या किमती ज्वेलरी, जकात शुल्क, राज्यकर, वाहतूक खर्च, जीएसटी आणि अन्य कारणांमुळे बदलत असतात.
Web Title : Gold-Silver Price Today | gold silver rate today in pune friday 10 march 2023
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
MP Imtiyaz Jaleel | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल
Nashik ACB Trap | नाशिक भूमि अभिलेखचे आणखी दोन अधिकारी आणि खासगी एजंट अँन्टी करप्शनच्या जाळ्यात