Gold Sliver Rates : चांदीच्या किंमतीत 1400 रूपयांपेक्षा जास्तीने वाढ, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आठवड्याच्या दुसर्‍या कामकाजाच्या दिवशी सोने-चांदीच्या किमतीमध्ये जोरदार तेजी नोंदली गेली. किमती धातूंच्या अंतरराष्ट्रीय किमतींमध्ये वाढ झाल्याने मंगळवारी दिल्ली सराफा बाजाराचे नवे दर आले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याच्या भावात 119 रुपयांची वाढ झाली आहे. तर, औद्योगिक मागणीत वाढ झाल्याने चांदीच्या किमतीत जबरदस्त तेजी आली आहे. एक किलोग्रॅम चांदीचा भाव 1,408 रुपयांनी वाढला आहे.

सोन्याचे नवे दर

एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 119 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढून 49,306 रुपयांच्या स्तरावर आला आहे. यापूर्वी सोमवारी सोन्याच्या किमतीमध्ये 26 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदली गेली होती.

चांदीचे नवे दर

सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात जास्त तेजी होती. औद्योगिक मागणीत वाढ झाल्याने दिल्ली सराफा बाजारात एक किलोग्रॅम चांदीचा दर 1,408 रुपयांनी उसळून 49,483 रुपये झाला आहे. सोमवारी चांदीचा व्यावसाय स्थिर होता. चांदीचा दर 48,075 रुपये प्रति किलोग्रॅमच राहिला. अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,773 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा दर 17.86 डॉलर प्रति औंस होता.

सोन्याच्या किमतीमधील वाढीची कारणे

एचडीएफसीचे सीनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी यांनी सांगितले की, कमजोर ग्लोबल संकेतांमुळे सेफ हेवन म्हणून गुंतवणुकदारांचा सोन्यातील गुंतवणुकीकडे कल वाढला आहे.

सोन्यात फायदा कमावण्याची संधी आहे?

एक्सपर्टचे म्हणणे आहे की, अंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (खचऋ) ग्लोबल ग्रोथचा अंदाज घटवला आहे आणि म्हटले आहे की, सध्या महामारीमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांची स्थिती खुप चिंताजनक होईल. आयएमएफच्या अंदाजानुसार, 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 4.9 टक्केंची घसरण येईल. हेच कारण आहे की, सोन्याच्या किमतीमध्ये लागोपाठ तेजी दिसून येत आहे. मागील 10 वर्षातील आकडे पाहिल्यास समजते की, या दरम्यान, सोन्यात खुप कमी अवमूल्यन दिसून आले. असेट क्लास म्हणून गोल्ड फंडमध्ये ना कोणती डिफॉल्टची जोखीम आहे, नाह क्रेडिटची जोखीम आहे. मोठ्या कालावधीसाठी महागाईबाबत बोलायचे तर ती 7 ते 8 टक्केच्या जवळपास राहीली आहे आणि गोल्डने सुमारे याच्या जवळपासच रिटर्न दिले आहे.