…म्हणून ‘सोनं-चांदी’ महागलं, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या किंमती आणि लग्नसराईमुळे वाढलेल्या मागणीमुळे सोनं खरेदी करणं महागलं आहे. दिल्लीच्या सराफ बाजारात बुधवारी सोनं 462 रुपयांनी महागलं, तर चांदी 1,047 रुपयांनी महागली. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोनं 239 रुपयांनी महागलं होतं.

सोन्याचे दर –
बुधवारी दिल्ली सराफ बाजारात 99.9 टक्के असलेलं सोनं 42,339 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर 1,606.60 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले आहे.

चांदीचे दर –
बुधवारी सोन्यांचे दर वाढल्यानंतर चांदीच्या दरात देखील तेजी आली आहे, दिल्ली सराफ बाजारात चांदी 1,047 रुपयांनी महागली. त्यामुळे चांदी 48,652 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली.

का महागलं सोनं चांदी –
एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या किंमती आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे देशांतर्गत सराफ बाजारात परिणाम पहायला मिळत आहे. चीनमधील जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं 1600 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले.

सोन्या चांदीच्या दागिण्यांवर हॉलमार्किंग –
पुढील 15 जानेवारी 2021 पासून सराफ बाजारात हॉलमार्किंग नसलेले सोन्या चांदीच्या दागिण्यांची विक्री होणार नाही. जर एखादा सराफ अशी विक्री करेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल. सरकारचा नवा नियम लागू होण्यापूर्वी तयारीसाठी सराफांना 1 वर्षाचा कालावधी दिला आहे. या एका वर्षानंतर फक्त नोंदणीकृत ज्वेलर्सला हॉलमार्किंगचे दागिणे विकण्यास परवानगी दिली जाईल. नोंदणीकृत सराफांना फक्त तीन ग्रेडमध्ये म्हणजेच 14, 18, 24 कॅरेट सोन्याचे दागिणे विक्रीची परवानगी असेल. सराफांना एका दागिण्यावर हॉलमार्किंगसाठी 35 रुपयांचा खर्च येतो. चांदीच्या दागिण्यांवर 25 रुपये हॉलमार्किंगसाठी घेतले जातात.

You might also like