सोन्याचा भाव जैसे थे तर चांदी चकाकली, जाणून घ्या आजचा दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसापासून सातत्याने सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार होताना दिसत आहे. शुक्रवारी (दि. 9) संध्याकाळी बाजार बंद होताना मुंबई आणि पुण्यात सोन्याच्या भावात कोणताही बदल झाला नाही. मात्र चांदीच्या दरात 840 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये शनिवारी (दि. 10) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,560 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 45,560 रुपये इतका आहे. तर चांदीचा दर 67,500 रुपये प्रतिकिलो इतका आहे.

गेल्या महिन्यात 24 मार्च रोजी सोन्याची किंमत 1020 रुपयांनी वाढली होती त्यानंतर मंगळवारी 640 रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी पुन्हा एकदा 250 रुपयांची वाढ झाली. मात्र इतर र दिवशी सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट झाली आहे. गेल्या 28 फेब्रुवारीला सोन्याचा भाव हा 45,930 रुपये इतका होता तर 31 मार्चला तो 44,370 रुपये इतका झाला होता.

चांदीच्या दरात गुरूवारच्या तुलनेत 840 रुपयांची वाढ झाली आहे. आज शनिवारी (दि. 10) सकाळी हा दर 67,500 रुपये इतका आहे. गुरूवारी संध्याकाळी हा दर 66,660 रुपये इतका होता. चांदीच्या भावात गेल्या 10 दिवसात चढ-उतार होत आहेत. गेल्या 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव हा 67,500 इतका होता, तर 31 मार्चला तो 65,500 रुपये इतका होता. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्याने होणारी घसरण पाहता गुंतवणुकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे. अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणे हा सुरक्षित आणि हमी देणारा पर्याय ठरत असल्याने गुंतवणूक करणा-यांची संख्या वाढत आहे.