ताज्या बातम्यामुंबई

MCX : सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या दोन दिवसात सोन्याचा भाव वाढला होता. मात्र आज शुक्रवारी सोन्याचांदीच्या किमतीत घसरण दिसून आली आहे. तर गुरुवारी १५ एप्रिलला यूएस ट्रेझरी यील्ड एक महिन्याच्या घटत्या पातळीवर आल्याने सोन्याचा दर या आठवड्यात वाढल्याचे पाहायला मिळाले होते. तर एमसीएक्सवर जून वायदानुसार सोन्याचा आजचा (शुक्रवारी) भाव ५५ रुपयांनी कमी होऊन प्रति १० ग्रॅमनुसार ४७,१२० रुपये इतका झाला आहे. तसेच मे वायदानुसार चांदीची किंमत १७९ रुपयांनी स्वस्त होऊन ६८,३७५ रुपये प्रतिकिलो झाला आहे.

सराफा बाजारात सोन्याचांदीची किंमत –

२२ एप्रिल लग्नाच्या मुहूर्तामुळे सोन्याच्या मागणीत वाढ दिसून आल्याने सोन्याचे दर गुरुवारी वधारले होते. तर सराफा बाजारात सोन्याचा दर १५९ रुपयाची वाढ होऊन तो प्रति १० ग्रॅम ४६,३०१ रुपयांपर्यंत राहिली. तसेच, चांदीचा भावही २०६ रुपयांनी वाढला आहे आणि दिल्ली सराफा बाजारात त्याचा भाव ६७,१६८ रुपये प्रति किलो होता.

सोन्यामधील गुंतवणूक वाढली –
कोरोनाच्या महामारीत, टाळेबंदीत अर्थव्यवस्था अस्थिर झाली आहेत. म्हणून नागरिक आणखी एकदा सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा आधार घेत आहेत. गेल्या आर्थिक वर्ष २०२०- २१ मध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये गुंतवणूकदारांनी तब्बल ६,९०० कोटी गुंतवले होते.

या दरम्यान, वर्ष २०२१ च्या १ जूननंतर हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकले जाऊ शकत नाहीत. भारतीय मानक ब्यूरो म्हणजेच BISनेही यासंदर्भात गेल्या महिन्यात एक अधिसूचना जारी केली होती. सोन्याची शुद्धता आता ३ श्रेणींमध्ये विभागली जाईल. पहिल्यांदा २२ कॅरेट, दुसरा १८ कॅरेट आणि तिसरा १४ कॅरेट अशा या श्रेण्या आहेत.

Back to top button