Gold Price Today MCX : डॉलरमध्ये घसरण सोन्याला झळाळी, सोन्याचे दर 50 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – सोन्या चांदीच्या दरात लग्नसराईच्या काळामुळे चढउतार सुरुच आहे. आज (गुरुवार) रुपयाच्या तुलनेत डॉलरची घसरण झाल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. आरबीआयने केलेल्या घोषणेनंतर शेअर बाजार आज थंड आहे. रुपया 7 पैशाच्या वाढीसह 73.84 च्या पाळीवर व्यापार करत आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता MCX वर जूनसाठीच्या डिलिव्हरी किंमतीत 176 रुपयांनी वाढ होऊन 47 हजार 176 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि ऑगस्टसाठीच्या डिलिव्हरीची किंमत 170 रुपयांनी वाढून 47500 रुपयांवर पोहोचली आहे. दिवाळीपर्यंत MCX वर सोन्याचा दर 50 हजारांच्या पातळीवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

MCX वर चांदीच्या दरात देखील वाढ होताना दिसत आहे. जुलै डिलिव्हरीच्या भावात 335 रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर 69954 रुपये प्रति किलो झाला आहे. तर सप्टेंबरच्या चांदीच्या भावात 429 रुपयांची वाढ होऊन 71027 रुपये प्रति किलो भाव झाला आहे. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी (दि.5) यामध्ये घसरण झाली होती. सोन्याच्या दरात 317 रुपयांची घसरण होऊन 46382 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढ्या दरावर बाजार बंद झाला होता. तर चांदीची किंमत 2328 वाढून 70270 रुपये प्रति किलो वर पोहचली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. इन्व्हेस्टिंग डॉट कॉमवर सकाळी साडेअकराच्या सुमारास उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, जून मधील डिलिव्हरीसाठी सोन्याचे भाव डॉलरने वाढून 1719 डॉलर प्रति औंस, तर चांदीचा भाव 0.26 डॉलरने वाढून 26.78 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत होता.

प्रमुख चलनाच्या तुलनेत डॉलर कमजोर

डॉलर निर्देशांक -0.023 ने घसरुन 91.270 वर आला. हा निर्देशांक जगातील प्रमुख सहा चलानांच्या तुलनेत डॉलर कमजोर असल्याचे दर्शवते. 10 वर्षासाठी यूएस बाँडचे उत्पन्न सध्या 1.577 टक्क्यांनी घसरत आहे. ज्यावेळी उत्पादनावरील दबाव वाढत असतो त्यावेळी सोन्याच्या दरात वाढ होते. या दिवाळीपर्यंत सोन्याचा दर 50 हजारांच्या आसपास जातील असे तज्ज्ञांचे मत आहे.

म्हणून भारतात सोन्या-चांदीच्या दरात तेजी

एचडीएफसी सिक्युरिटीजेच वरिष्ठ विश्लेशक तपन पटेल यांच्या मतानुसार, सोमावरी न्युयॉर्कच्या कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे स्पॉट किमतीत वाढ झाल्याने याचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर झाला. याशिवाय इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत डॉलर कमजोर झाल्याने त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमती मजबूत झाल्या.