Today Gold Rate : सोने खरेदीची हीच योग्य वेळ ! आजपर्यंत 9000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने-चांदीची खरेदी करण्यासाठी सद्याचा कालावधी योग्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. देशांतर्गत बाजारात सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या किमतीमध्ये तेजी आली आहे. एमीसीएक्सवर सोन्याचे दर 0.4 टक्क्यांनी वाढले असून सोन्याचा दर 47 हजार 265 रुपये प्रति तोळा झाले आहे. तर चांदीचे दर 01.1 टक्क्यांनी वाढले आहेत. या वाढीनंतर चांदीची किंमत 68 हजार 534 रुपये प्रति किलोग्राम झाली आहे. यापूर्वीच्या सत्रात सोने-चांदीच्या दरात 0.42 टक्क्यांनी घसरण झाली होती.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. त्यामुळे सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56 हजार 200 रुपये प्रति तोळा या उच्चांकी स्तरावर पोहचले होते. यानंतर आजपर्यंत सोन्याचे दर 9000 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 0.20 टक्क्यांनी वाढून 1784.94 डॉलर प्रति औंस या स्तरावर पोहोचले आहेत.

सोन्याचे आजचे दर

दिल्लीच्या सराफा बाजारात आज (गुरुवार) सोन्याचे भाव 0.4 टक्क्यांनी वाढून 47 हजार 265 रुपये प्रति तोळावर पोहचले आहेत. मागील आठ महिन्यात कमी स्तरावर सोन्याचे दर आहेत. दिल्लीतील सराफा बाजारामध्ये बुधवारी (दि.28) सोन्याचे दर प्रति तोळा 505 रुपयांनी कमी जाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 0.2 टक्क्यांनी वाढून 1784.94 डॉलर प्रति औसवर पोहचले आहेत.

चांदीचे आजचे दर

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी चांदीच्या दरात वाढ झाली. या वाढीनंतर चांदीचे दर 68,534 प्रति किलोग्रामवर पोहोचले आहेत. बुधवारी चांदीच्या दरात 828 रुपयांनी घसरण झाली होती.