Gold-Silver Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण ! जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या २ महिन्यांनपासून सोन्यामध्ये घसरण होत आहे. सोन्यामध्ये जवळजवळ ३००० रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच जर सोन्याची ऑगस्ट २०२० च्या विक्रमी दराशी तुलना केली असता सोन्याच्या दरात १०००० रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवारी जागतिक बाजारात विक्रीकडे कल वाढला असताना दिल्लीमधील सराफा बाजारात सोन्याचे दर ३५८ रुपयांनी कमी होऊन ४५९५९ रुपये प्रति १० ग्रॅम इतके झाले होते. एचडीएफसी सिक्युरिटीजकडून हि माहिती देण्यात आली आहे. मागच्या वेळी सोन्याची किंमत ४६३१३ रुपये प्रति १० ग्रॅम होती.

एकीकडे सोन्याच्या दरात घसरण होत असताना चांदीच्या दरात मात्र तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीचा दर ६९१५९ रुपये प्रति किलोपर्यंत आला होता. काल ही किंमत ६९००८ एवढी होती. एचडीएफसी सिक्युरिटीजचे तज्ज्ञ (कमोडिटी) तपन पटेल म्हणाले की, जागतिक स्तरावरील सोन्याच्या विक्रीनुसार दिल्लीतील २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ३५८ रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या दरात १५१ रुपयांची वाढ होऊन ६९१५९ रुपये झाली आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडच्या (आयबीजेए) रेटवर नजर टाकल्यास आज सोन्याचे दर खालीलप्रमाणे (हे दर १० ग्रॅमवर विना जीएसटी)

९९९ (शुद्धता) – ४६८३८
९९५ – ४६६५०
९१६ – ४२९०४
७५० – ३५१२९
५८५ – २७४००

चांदी ९९९ – ६९२२६