Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत ‘घसरण’, चांदीमध्ये 700 रुपयांपेक्षा जास्तीची घट, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोमवारी भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घट नोंदली गेली. आज म्हणजेच 7 डिसेंबर 2020 रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम 104 रुपयांची घसरण झाली. त्याच वेळी चांदीच्या किंमतीतही घट नोंदली गेली. एक किलो चांदीची किंमत (Silver Price Today) 736 रुपयांनी घसरली. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोने प्रति 10 ग्रॅम 48,807 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदीचा दर प्रति किलो 63,357 रुपये होता. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील नरमाईमुळे भारतात देखील सोन्या-चांदीच्या किंमतीत घट झाली आहे.

सोन्याचे नवीन दर (Gold Price, 7 December 2020)
सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 104 रुपयांची घसरण झाली. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची नवीन किंमत आता प्रति 10 ग्रॅम 48,703 रुपये आहे. पहिल्या व्यापार सत्रात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 48,807 रुपयांवर बंद झाला होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत घसरून प्रति औंस 1,836 डॉलर आहे.

चांदीचे नवीन दर (Silver Price, 7 December 2020)
चांदीबद्दल बोलायचे झाल्यास आज त्यातही घट नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीमध्ये प्रति किलो 736 रुपयांची घट नोंदली गेली. चांदीची किंमत 62,621 रुपये प्रति किलोवर पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी चांदी प्रति औंस 23.92 डॉलरवर बंद झाली.

का झाली मौल्यवान धातूंमध्ये घसरण
एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे सोन्याच्या किंमतींवर परिणाम झाला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीतील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरदेखील झाला आहे. त्याच वेळी, डॉलरवर बनलेल्या दबावामुळे दोन्ही मौल्यवान धातूंचे दरही कमी झाले आहेत.