Gold Rate Today : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीत किंचीत तेजी, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज भारतीय बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या. सोमवारी, 25 जानेवारी 2021 रोजी दिल्ली बुलियन बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 141 रुपयांची घट झाली, मात्र चांदीच्या भावात आज किंचित वाढ झाली. आज चांदीमध्ये केवळ 43 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर 10 ग्रॅम 48,650 रुपयांवर बंद झाले. त्याचवेळी चांदीचा दर 65,976 रुपये किलोग्रॅम होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत घसरण दिसून अली, तर चांदीचा भाव कायम राहिला.

सोन्याचे नवीन दर
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात 10 ग्रॅम 141 रुपयांची घसरण झाली. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची नवीन किंमत प्रति 10 ग्रॅम 48,509 रुपयांवर गेली आहे. व्यापार सत्राच्या आधी सोन्याच्या दर 10 ग्रॅम 48,650 रुपयांवर बंद झाला होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव आज 1,853.26 डॉलर प्रति औंसवर घसरला.

चांदीच्या नवीन किंमती
सोमवारी चांदीच्या भावात किरकोळ वाढ नोंदविली गेली. दिल्ली बुलियन बाजारपेठेत आज चांदीच्या दरात किलोमागे अवघ्या 43 रुपयांनी वाढ झाली. यासह सध्या चांदीचा दर प्रति किलो 66,019 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा भाव कालचा स्तर 25.55 डॉलर प्रति औंसच होता.

का झाली सोन्यात घट ?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्यामुळे भारतीय बाजारावरही परिणाम झाला. तसेच, सोने आणि चांदी आता स्थिर स्थितीत आहेत. अशा प्रकारे, त्यांच्या किंमतींमध्ये कोणतीही मोठी उलाढाल नाही. या व्यतिरिक्त आता कोरोना लसीचे वितरण आणि लसीकरण मोहिमेतील तेजी यामुळे मौल्यवान धातूंच्या किंमतींवरही परिणाम होत आहे.