Gold Price Today : 2 दिवसाच्या तेजीनंतर घसरले सोने, चांदीत किंचित तेजी, पहा नवे दर

नवी दिल्ली : भारतीय बाजारात या आठवड्यात दोन दिवसांच्या तेजीनंतर तिसर्‍या दिवशी गोल्डच्या भावात घसरण नोंदली गेली आहे. दिल्ली सराफा बाजारात 13 जानेवारी 2021 ला सोन्याच्या भावात 108 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट झाली. तर, चांदीच्या दरात आज सुद्धा 144 रुपये प्रति किग्रॅची किंचित वाढ झाली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 48,985 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 65,207 रुपये प्रति किग्रॅवर होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा गोल्डचा भाव आज वाढला, तर चांदीची किंमत स्थिर होती.

सोन्याचे नवे दर
दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या भाव 108 रुपये प्रति 10 ग्रॅमने घटला. राजधानी दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा भाव आता 48,877 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. यापूर्वी व्यवहाराच्या सत्रात सोन्याचा भाव 48,985 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव आज वाढून 1,857 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

चांदीचे नवे दर
सोन्याच्या उलट चांदीत किंचित वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात आज चांदीच्या दरात 144 रुपये प्रति किलोग्रॅमची तेजी नोंदली गेली. आता याचे दर 65,351 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा भाव वाढून 25.48 डॉलर प्रति औंसवर बंद झाला.

का झाली गोल्डमध्ये घसरण
एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) यांच्यानुसार, जगभरात वाढत असलेल्या कोरोना व्हायरसची पॉझिटिव्ह प्रकरणे पाहता गुंतवणुकदार सतर्क झाले आहेत. अशावेळी ते सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्यात पैसे लावत आहेत. कोविड-19 मुळे जागतिक अर्थव्यवस्था रूळावर येण्याबाबत गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे सोने आणि चांदीच्या तरात तेजी दिसत आहे. त्यांनी म्हटले की, डॉलरमध्ये झालेल्या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वाढत आहे.