MCX : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, आता सुमारे 9000 रूपयांनी स्वस्त झालं Gold, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. सोने-चांदीचा दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत होते. मात्र, आता पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा वायदा 0.18 टक्के घसरुन 47,548 रुपये दहा ग्रॅम इतका झाला आहे. तर चांदीचा वायदा 0.60 टक्क्यांनी घसरून 71,500 रुपये प्रतिकिलो झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती वाढत होत्या. तसेच चांदीच्या दरातही वाढ झाली होती. त्यानंतर आता सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. सोन्याचा दर सुरुवातीला 47,548 रुपयांवर गेला होता. तर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर 56,200 रुपये प्रतितोळा झाला होता. पण त्यानंतर आता सोने तब्बल 9 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सोन्या-चांदीचे दर सातत्याने कमी होत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर हाजीर सोने 0.2 टक्क्यांनी घसरणसह 1,823.73 डॉलर प्रति औंसवर आहे. अमेरिकेत सोन्याचा वायदा 0.1 टक्क्यांनी घसरणसह 1834.30 डॉलरवर बंद झाला. तसेच चांदी 0.6 टक्क्यांनी घसरण होऊन 27.47 डॉलर प्रति औंसवर गेला आहे. तर प्लॅटिनम 0.5 टक्क्यांनी घसरून 1,228.68 डॉलरवर गेला आहे.