Gold Price Today : सोने खरेदी करण्याची शानदार संधी, आतापर्यंत 11500 रुपयांनी घसरला दर, जाणून घ्या ‘लेटेस्ट रेट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय बाजारात लागोपाठ सातव्या दिवशी गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण नोंदली गेली. ज्यामुळे आज सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचा दर 10 महिन्यांच्या खालच्या स्तरावर आला आहे. गुरुवारी एमसीएक्सवर सोने वायदा 0.4% घसरून 44,768 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 0.8% घसरून 68,989 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली. मागील व्यवहाराच्या सत्रात सोन्याच्या दरात 600 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीत 1150 रुपये प्रति किलो पर्यंतची घसरण झाली होती. सोने मागील 10 महिन्यात सुमारे 11500 रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोने 56,200 रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहचले होते.

सोन्याचा आजचा भाव :
दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी गोल्डचा भाव 44,768 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला. जो 10 महिन्यातील सर्वात खालचा स्तर आहे. तर अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोन्याचा दर 9 महिन्यांच्या खालच्या स्तरावर आहे. हाजिर सोने 1,711 डॉलर प्रति औंसवर आले.

चांदीचे आजचा भाव :
दिल्ली सराफा बाजारात चांदी 68,989 प्रति किलोग्रॅमवर आली आहे. तर अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदी 0.4% वाढून 26.18 डॉलर प्रति औंसवर आली.

महिलांना घ्यायचा आहे लाभ, तर वाचा ही पूर्ण माहिती
स्थानिक बाजारात सोन्याची मागणी जोरदार वाढली आहे. लग्नसराई सुरू आहे आणि किंमती खुप खाली आल्या आहेत. अशावेळी मागणीचा दबाव आणखी वाढेल. अशाप्रकारे किंमतीतील घसरण शॉर्ट टर्म आहे. सोने लवकरच बाऊंन्स बॅक करेल. यासाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याची ही सर्वात चांगली संधी आहे.

एक्सपर्ट्चा सल्ला :
इंटरनॅशनल अँड कमोडिटी अ‍ॅट कॅपिटल अ‍ॅडव्हायजर क्षितिज पुरोहित यांनी म्हटले की, गोल्ड सध्या साईड-वे ट्रेंड करत आहे. म्हणजे याच्या किंमतीत मोठा बदल दिसू शकणार नाही. आणि एमसीएक्स गोल्ड 45600-45800 च्या स्तरावर राहू शकते. तर केडिया अ‍ॅडव्हायजरीचे एमडी अजय केडिया यांचे म्हणणे आहे की, सोन्याला 44,500-45000 रुपयांच्या दरम्यान सपोर्ट आहे. याचा अर्थ असा आहे की, याची किंमत 45 हजार रुपयांपेक्षा खुप खाली येण्याची शक्यता नाही. केडिया यांच्यानुसार शॉर्ट टर्ममध्ये सोने एकतर याच रेंजमध्ये राहिल किंवा वर जाईल.