Gold Price Today : सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण, 12000 रुपयांनी झाले ‘स्वस्त’, खरेदीची चांगली संधी

नवी दिल्ली : होय, एकीकडे लग्नसराई सुरू होत आहेत, तर दुसरीकडे सोन्याच्या दरात रोज घसरण होत आहे. अशावेळी ग्राहकांना सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण 10 ग्रॅम सोन्याचा भाव घसरून 44,400 रुपयांच्या जवळ आला आहे. भारतीय बाजारात आज लागोपाठ आठव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर सोने वायदा 0.3% घसरून 44,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले, तर चांदी 0.6% घसरून 65,523 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली.

मागील व्यवहाराच्या सत्रात सोन्याची किंमत कमी होऊन अनेक महिन्यांच्या खालच्या स्तरावर पोहचली. दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोने 44,589 वर बंद झाले होते.

आतापर्यंत 12000 रुपये झाले स्वस्त :
सोने मागील 10 महिन्याच्या खालच्या स्तरावर गेले आहे, तेव्हापासून आतापर्यंत याच्या दरात जवळपास 12000 रुपयांची घट झाली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोने 56,200 रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहचले होते.

10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव :
दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 44,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला. जो 10 महिन्याचा सर्वात खालचा स्तर आहे. सोन्याची किंमत आज 368 रुपयांनी कमी झाली आहे. तर अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोन्याचा दर 9 महिन्याच्या खालच्या स्तरावर आहे. हाजिर सोने 0.2% कमी होऊन 1,693.79 डॉलर प्रति औंसवर राहिले.

1 किलो चांदीचा ताजा भाव :
दिल्ली सराफा बाजारात चांदी 65,523 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली आहे. तर अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदी 0.2% वाढून 25.35 डॉलर प्रति औंसवर आली.

जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला :
स्थानिक बाजारात सोन्याची जोरदार मागणी आहे. लग्नसराई सुरू आहे आणि किंमती खुप खाली आल्या आहेत. अशावेळी मागणीचा दबाव आणखी वाढेल. या दृष्टीने किंमतीत घसरण शॉर्टटर्मची बाब आहे. सोने लवकरच बाऊंस बॅक करेल. यासाठी सोने खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. एक्सपर्टचे म्हणणे आहे की, सोने 43,880 रुपयांपर्यंत येऊ शकते.