Gold Price Today : सोन्याच्या किमतीत घट तर चांदीही घसरली, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत घट नोंदविली गेली. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी म्हणजेच २४ जानेवारी २०२१ रोजी सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम १४८ रुपयांची घसरण झाली, तर चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण नोंदवली गेली. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचा दर १० ग्रॅम ४६,४५५ रुपयांवर बंद झाला. त्याचबरोबर चांदीचा दर प्रति किलो ६९,५६२ वर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आज सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदवली गेली, तर चांदीचा भाव जश्याचा तसा राहिला.

सोन्याची नवी किंमत : दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या किंमती प्रति १० ग्रॅम १४८ रुपयांनी खाली आल्या आहेत. यापूर्वी व्यापार सत्रात सोन्याचा दर १० ग्रॅम ४६,४५५ रुपयांवर बंद झाला होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज प्रति औंस १,८०७ डॉलरवर पोहोचली.

नवीन चांदी किंमती – चांदीच्या किंमतीत बुधवारी घट नोंदवली गेली. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये या मौल्यवान धातूची किंमत ८८६ रुपयांनी घसरून ६८,६७६ रुपये प्रति किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव प्रति औंस २७,६३ डॉलर होता.

का घसरले सोन्याचे दर –
एचडीएफसी सिक्युरिटीज वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार रुपया आज डॉलरच्या तुलनेत जवळपास १२ पैशांनी मजबूत झाला. यामुळे भारतीय बाजारपेठेतील सोन्याच्या किंमती कमी झाल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या उच्च किंमतीवर भारतीय गुंतवणूकदारांनी नफा वसूल केला. तसेच दिल्ली बुलियन बाजारात सोन्याचे दर कमी झाले.