सोनं ‘स्वस्त’ तर चांदी ‘महाग’ ! अजूनही सोनं खरेदी करण्यासाठी आहे संधी; जाणून घ्या काय आहेत दर?

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – अजूनही सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. कारण, सध्या बाजारात सोनं स्वस्त झालंय तर, चांदी महाग झाली आहे. आज भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत थोडीशी वाढ झालीय. दिल्ली सराफा बाजारात 16 मार्च 2021 रोजी प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या दर 45 रुपये इतका आहे. तर, सोन्याबरोबर चांदीची किंमत देखील वाढलीय. मागील ट्रेडिंग सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 44,436 रुपये प्रति 10 ग्रॅम तर, त्याचवेळी चांदी 66,624 रुपये प्रति किलो दरावर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज सोन्याचे भाव कमी झाले तर, चांदीच्या किमतीत काही फरक पडलेला दिसून येत नाही.

सोन्याचे ताजे दर :
मंगळवारी सराफा बाजारात सोने मंगळवारी 45 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढले. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची किंमत 44,481 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. यापूर्वीच्या सत्रात सोन्याचे दर 44,436 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. त्याचवेळी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याचा दर घटला आहे.

चांदीच्या किमतींमध्ये थोडाशी वाढ नोंदविली आहे. दिल्ली सराफा बाजारात, या मौल्यवान धातूची किंमत 66,740 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचली आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात 26.11 डॉलर्स प्रति औंस इतकी चांदीची किंमत होती.

का सोन्याच्या किंमतीत तेजी झाली :
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्या मते, न्यूयॉर्कच्या कमोडिटी एक्सचेंज कॉमेक्समध्ये सोन्याचे दर थोडेसे कमी होऊन स्थित झाल्याने भारतातील सोन्याच्या किंमतीत वाढ नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या तुलनेत, डॉलरच्या तुलनेत रुपये मजबूत झाल्याने सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.