Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ ! तरीही 46 हजारांच्या खाली भाव, चांदी झाली महाग, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय बाजारात आज सोन्याच्या भावात तेजीची नोंद झाली आहे. दिल्ली सराफ बाजारात सोमवारी 1 मार्च 2021 ला सोन्याची किंमत 241 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वाढीनंतर 46 हजारच्या खालीच राहिला आहे. तसेच चांदीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफ बाजारात 45,279 रुपये प्रति 10 ग्रॅमवर थांबले होते. तेव्हा चांदी 68,096 प्रति किलोग्रॅमवर येऊन थांबली. आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोने आणि चांदी यांच्या दरातील वाढीची नोंद झाली.

सोन्याची नवीन किंमत ( gold price 1 मार्च 2021)

दिल्ली सराफ बाजारात सोमवारी सोन्याचे भाव 241 रुपये प्रति ग्रॅमने वर आले. राजधानी दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्ध सोन्याचा नवीन भाव आता 45,520 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. याआधी व्यवसाय सत्रात सोन्याचा भाव 45,279 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. तेच आंतरराष्ट्रीय व्यापारात सोन्याचा भाव आज वाढून 1,753 डॉलर प्रति औस गाठली.

चांदीची नवीन किंमत ( silver price 1 मार्च 2021)

सोमवारी चांदीच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली आहे. दिल्ली सराफ बाजारात आतापर्यंत मौल्यवान वस्तूंच्या किंमतीत 781 रुपयांच्या वाढीसोबत 68,877 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा भाव प्रति औस 26.90 डॉलरवर पोहचला.

सोन्याची दरात वाढ का झाली?

HDFC Securities चे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढल्याचा फटका भारतीय बाजारांवर दिसून आला आहे. तेच डॉलरच्या तुलनेत रुपया आज 16 पैशांच्या मजबुतीने व्यापार करत होता. त्यामुळे दिल्लीत सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत तेजी दिसून आली.