Gold-Sliver Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, चांदीचा भाव 1200 रूपयांपेक्षा जास्तीनं वाढला, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बुधवारी भारतीय बाजारामध्ये सोन्याच्या किमती जोरात वाढल्या. आज म्हणजेच 2 डिसेंबर 2020 रोजी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम 675 रुपयांची चांगलीच वाढ दिसून आली. त्याचबरोबर चांदीच्या किमतीतही वाढ नोंदविण्यात आली. एक किलो चांदीची किंमत 1280 रुपयांनी वाढली आहे. यापूर्वी मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर 10 ग्रॅम 47,494 रुपयांवर बंद झाले होते. मंगळवारी चांदी 61,216 रुपये प्रतिकिलो होती. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेजीमुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे.

नवीन सोन्याचे दर –

बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 675 रुपयांची वाढ झाली. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्ध सोन्याचे नवीन दर आता प्रति 10 ग्रॅम 48,169 रुपये आहेत. पहिल्या व्यापार सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅम 47,494 रुपयांवर बंद झाला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,800 डॉलर प्रतिऔंस झाली आहे.

नवीन चांदी किमती –

चांदीबद्दल बोलतानाही आज त्यात मोठी वाढ नोंदविली गेली. बुधवारी दिल्ली बुलियन बाजारात चांदीची किंमत 1280 रुपयांनी वाढली. त्याची किंमत 62,496 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 23.80 डॉलर प्रतिऔंसवर बंद झाली.

मौल्यवान धातूंमध्ये का झाली वाढ –

एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, गुंतवणूकदारांकडून केलेल्या खरेदीचा सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत सुरू असलेल्या वाढीचा भारतीय बाजारावरही परिणाम झाला आहे.