Gold Price Today : गोल्ड 51 हजारच्या जवळ पोहचले, चांदी झाली महाग, जाणून घ्या नव्या किमती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय बाजारात आज सुद्धा गोल्डच्या भावात तेजी नोंदली गेली आणि तो 51 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहचला. दिल्ली सराफा बाजारात 5 जानेवारी 2021 ला सोन्याच्या भावात 335 रुपये प्रति 10 ग्रॅमची उसळी नोंदली गेली. तर, चांदीच्या दरात आज 382 रुपयांची किंचित वाढ झाली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 50,634 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 67,311 रुपये प्रति किग्रॅवर होती. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या किंमती जैसे थे राहिल्या.

सोन्याचा नवा दर –
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव 335 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा भाव आता 50,969 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. या अगोदरच्या व्यवहाराच्या सत्रात सोन्याचा भाव 50,634 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव आज आणि कालचा स्तर 1,942 डॉलर प्रति औंस वरच राहीला.

चांदीचा नवा दर –
चांदीत मंगळवारी तेजी नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात आज चांदीच्या किंमतीत अवघी 382 रुपये प्रति किलोग्रॅमची वाढ नोंदली गेली आहे. आता तिचा दर 69,693 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा भाव 27.30 डॉलर प्रति औंसवर बंद झाला. काल सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव हाच होता.

का आली किमती धातुंमध्ये तेजी –
एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत 13 पैसे घटून 73.15 वर पोहचला. यामुळेच सोन्याच्या भावात उसळी दिसून आली. तर अजूनही लोक गोल्डच्या अन्य सर्व पर्यायांना गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानत आहेत. यामुळे गोल्डमध्ये मोठी खरेदी होत आहे. यामुळे किंमती धातुंच्या भावात तेजी जारी आहे.