Gold Rate : सोन्याच्या किमतीत 575 रुपयांनी वाढ, चांदीही चकाकली, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीत चांगली वाढ पाहायला मिळाली. गुरुवारी, 21 जानेवारी, 2021 रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 575 रुपयांची वाढ झाली. त्याचबरोबर आज चांदीच्या भावातही प्रचंड वाढ नोंदविण्यात आली. आज चांदीचा दर प्रति किलो 1,227 रुपयांनी वाढला. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर 10 ग्रॅम 48,550 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदीचा दर प्रतिकिलो 65,472 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत.

नवीन सोन्याचे दर :
दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या दरात 10 ग्रॅम 575 रुपयांची वाढ झाली. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची नवीन किंमत आता प्रति 10 ग्रॅम 49,125 रुपये झाली आहे. यापूर्वी व्यवसाय सत्रात सोन्याच्या दर 10 ग्रॅम 48,550 रुपयांवर बंद झाला होते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज प्रति औंस 1,870.50 डॉलरवर पोहोचली.

नवीन चांदीचे दर :
गुरुवारी चांदीच्या भावात मोठी वाढ नोंदविली गेली. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीच्या दरात आज प्रति किलो 1,227 रुपयांची वाढ झाली असून, आता त्याची किंमत प्रति किलो 66,699 पर्यंत पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीची किंमत 25.83 डॉलर प्रति औंस झाली.

का वाढले सोन्या- चांदीचे दर
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, न्यूयॉर्कच्या कमोडिटी एक्सचेंज (सीओएमएक्स) मध्ये सोन्याच्या किंमती वाढल्यामुळे भारतीय बाजारावर परिणाम झाला. त्याच वेळी, अमेरिकेतील कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी स्टिमुलस पॅकेजच्या अपेक्षेमुळे डॉलर सलग चौथ्या दिवशी कमकुवत झाला आहे. त्याचबरोबर, जगातील बड्या मध्यवर्ती बँकांकडील आर्थिक धोरणात दिलासा मिळाल्यामुळे सोन्याचा दरही वाढत आहे.