‘सोनं-चांदी’ महागलं, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय स्तरावर तेजी आल्याने आज स्थानिक सराफ बाजारात सोनं पुन्हा एकदा महागले. मंगळवारी दिल्लीत सराफ बाजारात सोने 80 रुपयांनी महागले. औद्योगिक क्षेत्रात वाढलेल्या मागणीने स्थानिक सराफ बाजारात चांदी देखील महागली. आज चांदी 101 रुपयांनी महागली. तज्ज्ञांच्या मते रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापार करारात अजूनही अनिश्चितता आहे. यामुळे मंगळवारी जगभरात सोन्याच्या किंमती वाढ झाली.

सोन्याचे दर
दिल्लीत सराफ बाजारात मंगळवारी 99.9 टक्के शुद्ध सोने 38,718 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. सोनं आज 80 रुपयांनी महागलं. सोमवारी सोने 38,879 रुपयांवरुन घसरुन 38,718 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,463 डॉलर प्रति औंस तर चांदी 16.91 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

चांदीचे दर
दिल्ली सराफ बाजारात चांदी 45,836 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. औद्योगिक क्षेत्रात वाढत्या मागणीमुळे आज चांदी 101 रुपयांनी महागली. काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरणं पाहायला मिळत होती परंतू आज पुन्हा एकदा सोनं चांदी महागलं आहे.

Visit : policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like