खुशखबर ! …म्हणून फेब्रुवारीपर्यंत 5000 रूपयांपर्यंत स्वस्त होणार सोनं

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाव्हायरसमुळे संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाने संपूर्ण जगभरात दहशतीचे वातावरण निर्माण केलं. अशा संकट काळात सोन्यात गुतंवणूक करणं योग्य ठरतं. आणि तो चांगला पर्याय ठरतो आहे. आता सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे.

ऑगस्टनंतर आत्तापर्यंत सोने जवळपास सहा हजार रुपये प्रति १० ग्रॅम स्वस्त झाला आहे. आता सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम एक हजार रुपयांपर्यंत आणखीन खाली आले आहेत. अमेरिकन डॉलर आणि कोरोना वॅक्सिनच्या बातम्यांमुळे सोन्या-चांदीचे दर घसरत आहेत. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या किमतीत घसरण अशीच होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नव्या वर्षापर्यंत सध्याच्या किमतीपेक्षा सोन्याचे दर पाच हजार रुपये प्रति १० ग्रॅम स्वस्त होऊ शकतात.

एसकोर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इक्बाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना वॅक्सिनबाबत आलेल्या चांगल्या माहितीमुळे चांदीच्या दरात सतत घसरण होत आहे. आगामी काळातही सोन्याच्या किमतीत घसरण होऊ शकत असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. पुढच्या वर्षात वॅक्सिन लॉन्च झाल्यास एमसीएक्स (MCX) वर सोन्याच्या किमती ४५ हजार पर्यंत येऊ शकतात. अमेरिकन Pfizer कंपनीने दावा केला आहे, की वॅक्सिंग तिसऱ्या ट्रायल मध्ये ९४ टक्‍क्‍यापर्यंत यशस्वी झाला आहे. त्यांनी तयार केलेले वॅक्सिन ९४. ५% प्रभावी असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय सिरम इन्स्टिट्यूटनेही भारतात वॅक्सिन तीन ते चार महिने उपलब्ध होणार असल्याचे सांगितले आहे. ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे ऑक्सफर्डच्या वॅक्सिनच्या प्रोजेक्टमध्ये सिरम इन्स्टिट्यूट पार्टनर आहे.