Gold-Silver Rate Today : सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं ! जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीय रुपयाचं मूल्य वधारल्यामुळं देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) कमी झाल्याचं दिसत आहे. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव 137 रुपयांनी घसरला आहे तर चांदीचा भाव वधारल्याचं (Silver Rate) दिसत आहे. चांदीच्या दरात प्रतिकिलो 475 रुपयांनी वाढ झाली आहे. परदेशी शेअर बाजारात घसरण आणि डॉलरचं मूल्य कमी झाल्यानं सोन्यामध्ये तेजी येऊ शकते असं तज्ज्ञांचं मत आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचे दर 59 रुपयांनी कमी होऊन 51034 रुपये प्रति तोळा झाले होते. चांदीमध्ये देखील 753 रुपयांची घसरण होऊन चांदीचे दर 62008 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते.

सोन्याचे नवे दर (Gold Rate on 27th October 2020)

मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव 137 रुपयांनी घसरला आहे. यानंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 51108 रुपये प्रतितोळा झाली आहे. याआधीच्या सत्रात सोन्याच्या दराचे ट्रेडिंग 51245 रुपयांवर बंद झालं होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1903.6 डॉलर प्रति औंस आहेत. डॉलर इंडेक्समध्ये 0.1 टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसत आहे.

चांदीचे नवे दर (Silver Rate on 27th October 2020)

चांदीच्या दरात मंगळवारी 475 रुपयांची वाढ होऊन तेजी पहायला मिळाली. यानंतर चांदीचे दर 62173 रुपये प्रति किलोवरून वाढून 62648 रुपये प्रति किलो झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे दर 0.5 टक्क्यांनी कमी होऊन 24.45 डॉलर प्रति औंस झाले आहेत.