खुशखबर ! सलग तिसर्‍या दिवशी सोन्याच्या दरात मोठी ‘घसरण’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. परदेशी बाजारात विक्री आणि रुपया मजबूत झाल्याने सलग तिसर्‍या दिवशी देशांतर्गत सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. सोमवारी 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 236 रुपयांची घसरण झाली. सोन्याप्रमाणेच चांदीचे दरही खाली आले आहेत. एक किलो चांदीच्या किंमती 376 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

सोमवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर 40,668 रुपयांवरून 40,432 रुपयांवर घसरले. तीन दिवसांत सोन्याची किंमत 1082 रुपयांनी स्वस्त झाली आहे. तसेच सोन्याप्रमाणे चांदीच्या किंमतीही खाली आल्या आहेत. दिल्ली सराफा बाजारात एक किलो चांदीची किंमत 48,011 रुपयांवरुन 47,635 रुपयांवर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1,550 डॉलर आणि चांदीची किंमत 17.97 डॉलर प्रति औंस होती.

सोन्या-चांदीच्या घसरणीचे कारण-
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, डॉलरच्या तुलनेत रुपयाची मजबुती आणि विदेशी बाजारात सोन्याच्या विक्रीमुळे देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत.

6 वर्षांच्या उदासीनतेनंतर सोन्याच्या ईटीएफच्या गुंतवणुकीत वाढ :
2019 मध्ये गुंतवणूकदारांनी गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मध्ये 16 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यापूर्वी सहा वर्षांपासून गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफमधून भांडवल काढून घेत होते. गेल्या वर्षी जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि स्टॉक आणि बाँड मार्केटमधील अनिश्चिततेच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांनी त्यांचे भांडवल वाचवण्यासाठी गोल्ड ईटीएफकडे वळले. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (एएनएफआय) आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी गुंतवणूकदारांनी 14 गोल्ड- लिंक्ड ईटीएफमध्ये एकूण 16 कोटी गुंतवणूक केली. 2018 मध्ये त्यांनी या निधीतून 571 कोटी रुपये काढले होते.

मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर इंडियाचे वरिष्ठ विश्लेषक व्यवस्थापक हिमांशू श्रीवास्तव म्हणाले की, इराण आणि अमेरिका यांच्यात अलिकडील तणाव आणि जागतिक अर्थव्यवस्थेला होणारे संभाव्य नुकसान पाहता वेळेत गुंतवणूक केल्याने गोल्ड ईटीएफमध्येही गुंतवणूक वाढू शकते. दरम्यान डिसेंबर 2019 पर्यंत सोन्याचे फंडांचे अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) डिसेंबर 2019 पर्यंत 26 टक्क्यांनी वाढून 5,768 कोटी रुपये झाले. डिसेंबर 2018 मध्ये ते 4,571 कोटी रुपये होते. ते म्हणाले की, सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे मालमत्तेचे एकूण मूल्य वाढले आणि म्हणूनच गोल्ड ईटीएफची एयूएम इतकी वाढली.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/