खुशखबर ! सोन्याच्या दरामध्ये 1000 रूपयांची ‘घसरण’, चांदीची ‘चमक’ देखील पडली ‘फिक्की’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोनं-चांदी खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. रुपया मजबूत झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात बिकवाली सोन्याच्या किंमतीत या वर्षातील सर्वात मोठी घसरण झाल्याने मंगळवारी सोनं स्वस्त झाले आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोनं 954 रुपयांनी स्वस्त झाले तर चांदीच्या दरात 80 रुपयांची घट झाली. सोमवारी सोनं आजपर्यंतच्या सर्वात उच्चांकी किंमतीवर पोहोचले होते. सोमवारी सोनं 44,503 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते.

सोन्याचे दर –
मंगळवारी सराफ बाजारात सोनं 43,549 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. दिल्लीत 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 770 रुपयांनी स्वस्त झाले. त्यामुळे हे सोनं 43,880 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

चांदीचे दर –
दिल्ली सराफ बाजारात चांदी 49,990 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,648 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले, तर चांदी 18.40 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली.

का स्वस्त झालं सोनं –
HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती कमी झाल्याने आणि रुपया मजबूत झाल्याने देशांतर्गत बाजारात सोनं स्वस्त झालं. मंगळवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 16 पैशांनी मजबूत झाला. ते म्हणाले की, कोरोना व्हायरस जगभरात पसरण्याच्या चिंतेने सोन्याच्या दरात जास्त घट होणार नाही.