Gold-Silver Prices | जागतिक बाजारात दर घसरल्याने सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने – चांदीच्या किमतीत (Gold-Silver Prices) मंगळवारी किरकोळ घसरण दिसून आली. जागतिक बाजारात आज सोने आणि चांदीचे भाव खाली आले, ज्याचा परिणाम भारतीय बाजारावर सुद्धा दिसून आला. (Gold-Silver Prices)

 

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मंगळवारी सकाळी Gold चा दर किरकोळ बदलासह ट्रेडिंग करत होता. सोन्याचा एप्रिल वायदा भाव 53,590 रुपये प्रति 10 ग्रॅमवर सुरू होता. अशाप्रकारे, चांदीचा वायदा भाव सुद्धा 70 रुपये तेजीसह 70,108 रुपये प्रति किलोग्रामवर ट्रेडिंग करत होता. (Gold-Silver Prices)

 

जगातिक बाजारात घसरला दर
जागतिक बाजारात आज सोन्याच्या दरात किरकोळ घसरण दिसून आली. डॉलरमध्ये कमजोरीमुळे सोने 2,000 डॉलर प्रति औंसपेक्षा थोडे खाली आले. कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा हाजीर भाव सुमारे 0.5 टक्के घसरून 1,986 डॉलर प्रति औंस होता.

 

एप्रिलपर्यंत 54 हजारच्या पुढे जाईल सोने
एचडीएफसी सिक्युरिटीजचे हेड, रिसर्च, तपन पटेल यांचे म्हणणे आहे की, रशिया – यूक्रेनमधील तणावामुळे (Russia – Ukraine conflict) आगामी काळात सोन्यात उसळी दिसेल. जागतिक बाजारात ते 2,005 डॉलर प्रति औंसच्या पुढे जाऊ शकते,
तर एमसीएक्सवर 54 हजार प्रति 10 ग्रॅमपेक्षा सुद्धा वर जाईल.

 

एक दिवस अगोदर आली होती बंपर तेजी
शेयर बाजारात मोठ्या घसरणीमुळे सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली.
सोन्याचा हाजीर भाव जिथे 1,300 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढला होता, तर चांदीच्या किमतीत 1,910 रुपये प्रति किलोग्रॅमची वाढ दिसत होती.
अंदाज आहे की, रशिया – यूक्रेनमध्ये शांतता कायम झाल्यानंतर सोने – चांदीच्या किंमतीत घसरण होईल.

 

Web Title :- Gold-Silver Prices | rupee to dollar brokerage fears rupee could plunge below 80 a dollar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा