लग्नसराईत पुन्हा वाढतोय सोन्याचा दर, जाणून घ्या Gold मध्ये कशी कराल गुंतवणूक अन् मोठी कमाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस व्हॅक्सिनबाबत (Coronavirus Vaccine) आलेल्या बातम्यानंतर अशी अपेक्षा होती की सोनेचांदी या मौल्यवान धातूंची झळाळी कमी होईल. परंतु, अमेरिकन प्रोत्साहन पॅकेज (US Stimulus Package) ची आशा वाढली. तसंच, इतर चलनांच्या तुलनेत डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्यामध्ये तेजी आली. गेल्या एक आठवड्यादरम्यान सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold and Silver Rates) मोठी तेजी पाहायला मिळत आहे.

सोन्याच्या दराची स्थिती
पुढील आठवड्यापासून अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे. कोरोना व्हायरस व्हॅक्सिनबाबत येणाऱ्या चांगल्या बातम्यांनंतरही सोन्यामध्ये तेजी आहे. अमेरिकेतील प्रोत्साहन पॅकेजबाबत आशा वाढल्यानं सोन्याला झळाळी आली आहे. डॉलरमधील कमजोरीमुळे सोन्याला सपोर्ट मिळतो आहे. अमेरिकेत जवळपास ९०८ अब्ज डॉलरच्या पॅकेजला सहमती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पॅकेज आल्यानंतर महागाई वाढेल अशी आणखी एक शक्यता असल्यानं सुरक्षितता वाटत आहे. एका आठवड्यापासून सोन्याचा भाव चढता आहे.

चांदीची स्थिती
MCX वर गेल्या एका आठवड्यापासून चांदीचे दर उच्च स्तरावर आहेत. अमेरिकन प्रोत्साहन पॅकेजबाबत आशा वाढल्याने चांदीलाही सपोर्ट मिळतो आहे. एका आठवड्यात MCX वर चांदीचे दर ६ टक्क्यांनी वाढले आहेत. सोन्याबरोबरच चांदीलाही झळाळी आली आहे. डॉलरमधील कमजोरीमुळे चांदीला सपोर्ट मिळत आहे. चांदीची औद्योगिक मागणी देखील वाढत आहे. दुप्पट लाभ होईल सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास सोन्यामध्ये तुम्ही दागिने, नाणी किंवा बिस्किटं, गोल्ड ETF, गोल्ड बाँड, गोल्ड फ्यूचर्स या माध्यमातून गुंतवणूक करू शकता. अनिश्चित परिस्थितीत सोन्यातून एक उत्तम रिटर्न मिळतो. सोन्यामध्ये केली जाणारी गुंतवणूक महागाई काळातील सुरक्षा कवच असते.

फिजिकल गोल्ड
पूर्वी दागिन्यांमध्ये गुंतवणूक हा सोन्यातील गुंतवणुकीचा सर्वात जुना पर्याय होता आणि आजही आहे. सुरुवातीच्या काळात हा पर्याय सर्वात चांगला पर्याय होता.
तसंच, सोन्याच्या नाण्यात गुंतवणूक केली जात असे. तुम्ही सराफाकडून आता ऑनलाइन गोल्ड देखील खरेदी करू शकता. बिलामध्ये शुद्धता आणि किंमत लिहिलेली आहे की नाही, हे अवश्य तपासा. सोन्याची किंमत कॅरेटनुसार निश्चित होते. त्यामुळे कॅरेट, मेकिंग चार्ज या गोष्टी व्यवस्थित तपासून सोनेखरेदी करा. अशाप्रकारे सोने खरेदी करताना सोन्याची शुद्धता आणि हॉलमार्किंगवर लक्ष द्या.

गोल्ड ETF
तुम्ही हे एक्सचेंजमधून खरेदी करू शकता. गोल्ड ETF हे NSE, BSE वर कॅश सेगमेंटमध्ये लिस्टेड असतं. तुम्ही याची खरेदी डिमॅट खाते किंवा ब्रोकरच्या माध्यमातून करू शकता. ऑनलाइन किंमत ट्रॅक करण्याची सुविधा असते. हे तुम्ही संपूर्ण भारतात कुठेही खरेदी किंवा विक्री करू शकता. १ गोल्ड ईटीएफ १ ग्रॅम सोनं असतं. यामध्ये भेसळीची चिंता नसते.

सॉव्हरेन गोल्ड
२०१५ मध्ये ही योजना लाँच करण्यात आली होती. यामध्ये तुम्हाला २. ५ टक्के वार्षिक व्याज मिळेल. तर SGB चा मॅच्यूरिटी कालावधी आठ वर्षांचा असतो. सरकारकडून स्वस्त सोनेखरेदीची संधी मिळते. बँक, एक्सचेंज, पोस्ट ऑफिस इ. मधून तुम्ही हे बाँड खरेदी करू शकता. यामध्ये कमीत कमी १ ग्रॅम आणि जास्तीत जास्त ४ किलोची गुंतवणूक करता येते. यामध्ये देखील भेसळीची भीती नसते. सॉव्हरेन गोल्ड बाँड ही योजना सरकारी आहे. सरकारच्या निर्देशावरून RBI यांची विक्री करते.