Gold Silver Prices Today | सोन्याचे प्रति 10 ग्रॅम दर 46698 रूपये तर चांदीनं खाल्ला भाव, जाणून घ्या

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  मागील काही दिवसांपासून घसरणारे सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Prices Today) पुन्हा वाढू लागले आहेत. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याची सांगता सोन्या-चांदीच्या दरातील तेजीनं झाली. शेअर बाजारात सोनं आणि चांदी यांचा भाव वधारला आहे. आणि चढ्या दरावरच बाजार बंद झाले. सोन्या-चांदीच्या दरात वाढ (Gold Silver Prices Today) होत असल्याने गुंतवणुकीसाठी (investment) हीच योग्य वेळ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जागतिक बाजारात तेजी

जागतिक बाजारातील (global market) तेजीसह सराफा बाजारत सोन्याचा भाव 256 रुपयांनी वधारुन 46,698 रुपयांवर बंद झाला. तर चांदीच्या भावात 662 रुपयांची वाढ झाली. चांदीचा सध्याचा दर (Silver rate) 66,111 रुपयांवर पोहचला आहे. गेल्या वर्षी सोन्या-चांदीच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर हे दर काहीसे घसरले होते. परंतु आता पुन्हा एकदा दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

यामुळे वाढले दर

अमेरिकेत आर्थिक गुंतवणुकीवर मिळणारा परतावा कमी झाल्याने जगभरात सोने आणि चांदीचे भाव वाढू लागल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे (HDFC Securities) ज्येष्ठ विश्लेषक तपन पटेल (Tapan Patel) यांनी सांगितले आहे. आर्थिक गुंतवणुकीवरील परतावा कमी झाल्यामुळे गुंतवणूकदार सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक अधिक प्रमाणात करु लागले आहे. परिणामी सोन्याला मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे याचा परिणाम सोन्याच्या बाजारभावावर होत आहे.

सोन्याचे दर वाढतच राहणार

सोन्याच्या दरात वाढ होण्याचा हा सिलसिला येथून पुढे काही दिवस सुरु राहिल, असा अंदाज अर्थविश्वातून व्यक्त करण्यात येत आहे.
सोन्यातील गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ असून अल्पावधीत सोन्यातील गुंतवणुक चांगला नफा मिळवून देऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
परंतु कोणत्याही फसव्या सल्ल्याला बळी पडू नये, असेही आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

Web Title : Gold Silver Prices Today | gold and silver prices rised in market

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Rain | पुण्याच्या रास्ता पेठेतील केईएम हॉस्पीटलसमोर भरपावसात रिक्षावर झाड कोसळलं; चालकासह महिला जखमी (व्हिडीओ)

Modi Government Schemes | मोदी सरकारच्या ‘या’ 12 योजना, ज्यांच्याद्वारे कर्जापासून उपचारापर्यंत मिळतेय लाखो रुपयांची मदत, जाणून घ्या

Pune Crime | बनावट ताडीसाठी लागणार्‍या वस्तुंची विक्री करणार्‍या 3 ठिकाणांवर छापा; दोघांना अटक करून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त