लग्नसराईच्या तोंडावर सोनं-चांदी ‘महागलं’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लग्नाचे मुहूर्त असल्याने सोनं खरेदी करणं महागात पडत आहे. लग्नाच्या मुहूर्ता दरम्यान मागणी वाढल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्याने बुधवारी दिल्ली सराफ बाजारात सोनं 225 रुपयांनी महागलं. सोन्याबरोबरच चांदीच्या भावात देखील तेजी आली आहे. सोन्याबरोबर चांदीच्या किंमती 440 रुपयांनी वाढल्या.

सोन्याचा भाव –
बुधवारी दिल्लीत सराफ बाजारात सोनं 225 रुपयांनी महागलं. यामुळे सोनं 38,715 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं. मंगळवारी सोनं 38,490 रुपये प्रति 10 ग्रॅम होतं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,461 डॉलर प्रति औंस तर चांदी 16.90 डॉलर प्रति औंस होती.

चांदीचे भाव –
सोन्याबरोबर चांदीच्या किंमतीत देखील तेजी आली आहे. बुधवारी चांदी 45,040 रुपयांनी वाढून 45,480 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली.

सोन्याच्या किंमती वाढण्याचे काय आहे कारण –
HDFC सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, लग्नाचे मुहूर्त असल्याने खरेदी वाढली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील किंमतीत तेजी आली आहे. तर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार करारावर अनिश्चितता वाढली आहे आणि हॉगकॉगमध्ये राजकीय उलथापालथी होत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया 30 पैशांनी घसरुन 71.77 च्या स्तरावर आला आहे.

ते म्हणाले की, व्यापार करारावर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची स्पष्टता नसल्याने गुंतवणूकदारात अनिश्चितता वाढली आहे, ज्यामुळे सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जात आहे.

सोन्यात उत्तम परतावा मिळवण्यासाठी येथे करा गुंतवणूक –
जगभरातील उत्तम गुंतवणूकदार म्हणून ओळखले जाणारे मार्क मोबियस यांनी संगितले की, सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची अपेक्षा ठेवत आहे. गुंतवणूकदारांना एसेट एलोकेशन संबंधित सल्ला देताना सांगितले की लोकांनी आपल्या कमाईतील किमान 10 टक्के सोन्यात गुंतवावे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like