‘सोनं-चांदी’ किंचित ‘महागलं’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागणी घटल्यानंतर सोमवारी सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोमवारी दिल्ली सराफ बाजारात सोनं 4 रुपयांनी महागलं. सोन्या बरोबरच चांदीच्या दरात देखील किंचित वाढ झाली आहे. चांदी 7 रुपयांनी महागली. HDFC सिक्योरिटीच्या मते मागणीत घट झाल्याने सोनं महागलं आहे.

सोन्याचे दर –
सोमवारी सराफ बाजारात सोन्याचं 40,784 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचलं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,560 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले तर चांदी 18.05 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली.

चांदीचे दर –
सोमवारी सराफ बाजारात चांदी 47,856 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली. आज चांदीच्या दरात 7 रुपयांनी वाढ झाली.

सोन्य चांदीच्या दर स्तिरावल्याचे कारण –
HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की डॉलरच्या तुलनेत रुपया घसरण्यास सुरुवात झाली आहे. रुपया 4 पैशांनी घसरुन 71.12 प्रति डॉलरवर स्तिरावला.

अशी करा सोन्याच्या खऱ्या-खोट्या दागिण्यांची पारख –
1. सोन्याचे दागिणे खरेदी करताना बीआयएस हॉलमार्क आवश्य पाहा. बीएसआय मार्क म्हणजे शुद्ध सोने. याबरोबर तुम्हाला हे देखील पाहावे लागेल की बीएसआय मार्क खरे आहे की खोटे. बीएसआय हॉलमार्कचे चिन्ह प्रत्येक दागिण्यावर असते त्याबरोबरच एक त्रिकोणी चिन्ह असते, यासह भारतीय मानक ब्युरोच्या चिन्हासह सोन्याची शुद्धता लिहिलेली असते.

2. यावरुन काही सेकंदात लक्षात येते की सोने खरे आहे की खोटे. ही चाचणी तुम्ही घरी देखील करु शकतात. यासाठी सोन्याला पिणेने एका जागेवर घासा त्यावर नायट्रिक अ‍ॅसिडचे काही थेंब टाका. सोन्याचा रंग बदलला नाही तर सोनं शुद्ध, परंतु सोनं हिरवं झालं तर सोनं खोटं आहे.

3. खऱ्या सोन्याची ओळख लोहचुंबक वापरुन देखील केली जाते. एक स्ट्रॉंग चुंबक घ्या आणि तो सोन्याच्या बाजूला ठेवा, सोनं त्याकडे आकर्षित झाले तर सोन्यात इतर धातूंची मिलावट आहे असे समजावे. परंतु तसे झाले नाही तर सोनं शुद्ध समजावे.

4. पाण्याच्या माध्यमातून देखील तुम्ही सोन्याची चाचणी घेऊ शकतात. सोन्याच्या दागिण्याला बादलीभर पाण्यात बुडवा, जर सोनं बुडलं तर सोनं खरं आहे आणि सोनं काही वेळ पाण्यावर तरंगलं तर सोनं खोटं आहे असं समजावं. सोनं कितीही हलकं असेल, कितीही कमी प्रमाणात असो, ते पाण्यात बुडते.

फेसबुक पेज लाईक करा –