सोनं पुन्हा ‘महागलं’ मात्र चांदी ‘उतरली’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रुपया गडगडल्याने देशांतर्गत बाजारात सोनं खरेदी करणं महागलं आहे. गुरुवारी दिल्ली सराफ बाजारात सोनं 63 रुपयांनी महागलं. चांदीच्या दरात मात्र घसरणं झाली. चांदी 93 रुपयांनी स्वस्त झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढल्याने आणि रुपया गडगडल्याने सोन्याच्या किंमतीत तेजी आली.

सोन्याचे दर –
गुरुवारी दिल्ली सरकार बाजारात सोनं 40,723 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. बुधवारी सोनं 51 रुपयांनी स्वस्त झालं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यांच्या किंमती 1,556 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले तर चांदी 17.67 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली.

चांदीचे दर –
गुरुवारी चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. औद्योगिक क्षेत्रातील मागणी कमी झाल्याने चांदी 47,082 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

सोन्याच्या दरात वाढ होण्याचे कारण –
HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की अमेरिका आणि चीन यांच्यात पहिल्या टप्प्यात व्यापार करार झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील करारासंबंधित गुंतवणूकदार तर्क बांधत आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात तेजी आली आहे. याशिवाय चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

सोन्याच्या दागिणासंबंधित महत्वाच्या बाबी –
1. जर तुम्ही सोनं चांदी खरेदी/विक्री करणार असाल तर सर्वात आधी सोन्याचे दर नक्की पहा. कोणीही व्यक्ती IBJA म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या https://ibjarates.com/ या वेबसाइटवर जाऊन पाहू शकतात.

2. IBJA द्वारे जारी करण्यात आलेले दर देशभरात सर्वमान्य असतात. या दरात 3 टक्के जीएसटीचा समावेश नसतो. सोनं विकताना तुम्ही IBJA च्या रेटचा तुम्ही आधार घेऊ शकतात.

3. तुम्हाला भाव माहित असल्यास तुम्ही सराफाकडून चांगला दर मिळवू शकतात. शुद्ध सोनं 24 कॅरेटचे असतं, परंतु दागिणे घडवताना त्यात इतर धातू मिसळले जातात, कारण सोनं मऊ धातू आहे. त्यामुळे दागिण्यात 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो, ज्यात 91.66 टक्के सोने असते.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like