खुशखबर ! सलग दुसर्‍या दिवशी सोनं झालं ‘स्वस्त’, चांदीच्या किंमतीत मोठी ‘घसरण’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सलग दुसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या किंमतीत घसरण आली आहे. भारतीय रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीत घट झाली. बुधवारी दिल्ली सराफ बाजारात सोनं 62 रुपयांनी स्वस्त झालं. कोरोना व्हायरस पसरलेल्या भीतीमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण होत आहे. तर चांदी देखील स्वस्त झाली. बुधवारी चांदी थोडी थोडकी नाही तर 828 रुपयांनी स्वस्त झाली. मंगळवारी सोनं 954 रुपयांनी स्वस्त झालं होतं.

सोन्याचे दर –
दिल्ली सराफ बाजारात बुधवारी सोन्याच्या किंमतीत घसरणं झाली. यामुळे सोनं 43,502 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मंगळवारी सोनं 43,564 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते.

चांदीचे दर –
बुधवारी दिल्ली सराफ बाजारात चांदीचे दर 828 रुपयांनी स्वस्त झाले. चांदी 48,146 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. मंगळवारी चांदी 48,978 रुपये प्रति किलोग्रॅम होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,684 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले तर चांदी 18.10 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली.

का झाली सोन्या चांदीच्या किंमतीत घट –
HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अ‍ॅनालिस्ट तपन पटेल म्हणाले, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने सोनं स्वस्त झाले. बुधवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 20 पैशांनी मजबूत झाला होता. सुरुवातीला रुपया 11 पैशांनी वधारुन 71.74 प्रति डॉलरवर पोहोचला होता. याशिवाय पटेल म्हणाले, कोरोना व्हायरस पसरल्याने सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसत आहे परंतु ती सीमित आहे.

You might also like