उच्चांकी ! सोन्याच्या दरात ‘कमाली’ची वाढ, इतिहासात आत्तापर्यंत सर्वात ‘महाग’ झालं Gold

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढल्याने सोन्याचे दर गगनला भिडले आहेत. शेअर बाजारात घसरण झाल्याने गुंतवणूकादार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करत आहेत. सोमवारी दिल्लीत सराफ बाजारात सोन्याचे दर 720 रुपयांनी वाढले. तर चांदीच्या किंमतीत 1,105 रुपयांनी वाढ झाली. तज्ज्ञांच्या मते अमेरिकाच्या हवाई हल्ल्यात इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांच्या मृत्यू झाल्याने आखाती देशात तणाव वाढला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत.

सोन्याचे दर –
सोमवारी दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर 41,010 रुपयांवरून वाढून 41,730 रुपयांवर गेले. दोन दिवसांपासून सोन्याचा दरात 1500 रुपयांनी वाढ झाली आहे.

चांदीचे दर –
सोन्याचे दरात तेजी बरोबर चांदीच्या दरात देखील तेजी आली आहे. चांदी 48,325 रुपयांवरुन 49,430 रुपयांवर पोहचली.

सोन्या चांदीच्या दरात तेजीचे कारण –
HDFC सिक्योरिटीजचे देवर्ष वकील यांनी सांगितले की अमेरिका आणि इराणमध्ये तणावाच्या कारणाने सोने उच्चांकीवर पोहचले आहे. याशिवाय रुपयांत कमजोरी आल्याने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती वाढल्याने देशांतर्गत बाजारात देखील तेजी आली आहे.

ते म्हणाले की तणावामुळे इतर देशांच्या चलनाबरोबरच भारतीय रुपयात देखील घसरण झाली आहे क्रुड ऑइलमध्ये तेजी आल्याने देखील रुपया घसरला आहे. रुपया सोमवारी एक डॉलरच्या तुलनेत 25 पैशांनी घसरणं झाली. सोमवारी सकाळी रुपया डॉलरच्या तुलनेत 31 पैशांनी घसरुन 72.11 वर ट्रेंड करत होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/