Gold-Silver Rate | आठवड्यात सोने महागले तर चांदीचे भाव घटले, सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता

0
445
Gold-Silver Rate | gold silver price weekly updates know details
File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold-Silver Rate | आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये (International Market) सोन्या-चांदीच्या दरात वाढ (Gold-Silver Rate) झाल्यावर त्याचा परिणाम भारतीय बाजार (Indian Market) पेठेवर होतो. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली तर चांदीच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळाली. या व्यावसायिक सप्ताहामध्ये सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 145 रुपयांची वाढ झाली. तर चांदीच्या दरात 81 रुपयांची किरकोळ घसरण झाली.

 

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion and Jewelers Association) म्हणजे IBJA च्या वेबसाईटनुसार, मागील व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 23 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीत 24 कॅरेट सोन्याचा दर 57 हजार 044 रुपये होता. यामध्ये शुक्रवारी वाढ होऊन सोन्याचा दर 57 हजार 189 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 68 हजार 273 रुपयांवरुन 68 हजार 192 रुपये प्रति किलोवर आली. (Gold-Silver Rate)

 

गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर

23 जानेवारी – 57,044 रुपये प्रति 10 ग्रॅम
24 जानेवारी – 57,322 रुपये प्रति 10 ग्रॅम
25 जानेवारी – 57,57,138 रुपये प्रति 10 ग्रॅम
26 जानेवारी – हॉलिडे
27 जानेवारी – 57,189 रुपये प्रति 10 ग्रॅम

 

गेल्या आठवड्यातील चांदीचा दर

23 जानेवारी – 68,273 रुपये प्रति किलो
24 जानेवारी – 68,137 रुपये प्रति किलो
25 जानेवारी – 67,894 प्रति किलो
26 जानेवारी – हॉलिडे
27 जानेवारी – 68, 192 रुपये प्रति किलो

 

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, यंदा सोन्याचा दर 64 हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सोन्याचा सध्याचा ट्रेंड पाहता सोन्याचे दर या लेव्हलवर पोहचू शकतात. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक (Kedia Advisory Director) अजय केडिया (Ajay Kedia) यांच्या माहितीनुसार, सोन्याच्या दरामध्ये यंदा तेजी राहू शकते. सेंट्रल बँकेने (Central Bank) सोने खरेदी केल्याने यामध्ये पॉझिटिव्ह परिणाम दिसून येतील. केडिया म्हणाले 2023 मध्ये सोन्याचे दर 64 हजारांच्या पुढे जाऊ शकतात.

 

 

Web Title :- Gold-Silver Rate | gold silver price weekly updates know details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Buldhana Crime News | धक्कादायक ! काकाकडून 15 वर्षाच्या अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार

Chinchwad Bypoll Elections 2023 | देवेंद्र फडणवीस यांची जगताप कुटुंबियांच्या घरी अचानक भेट; भेटीमुळे चर्चांना उधान

Pune Crime News | दत्तवाडीतील जूगार अड्ड्यावर छापा; १५ जणांवर गुन्हा दाखल