Gold-Silver Rate Today | लग्नसराईच्या दिवसात थोडा दिलासा, सोन्याचे दर स्थिरावले, जाणून आजचा सोने-चांदीचा दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold-Silver Rate Today | पौष महिना सरताच सगळीकडे लग्नसराईला सुरुवात होते. त्यामुळे बाजारात सोनं खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते. मात्र मागील काही दिवसांपासून सोन्य-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate Today) मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळतेय. परंतु आज सोन्याचे दर स्थिर आहेत. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर (24 Carat Gold) आता स्थिरावले आहेत. सोन्या-चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56 हजार 730 रुपये आहे. तर चांदी 72 हजार 200 रुपये प्रति किलो दर आहे.
जागतिक बाजारात सध्या वाढत चाललेली महागाई आणि त्यानंतर आगामी काळात मंदीची लाट येण्याचा अंदाज पाहता अनेकांनी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोनं खरेदीकडे कल वाढवला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे. तसेच सुवर्णनगरी जळगावातही सोन्याच्या दराने (Gold-Silver Rate Today) मोठी उच्चांकी पातळी गाठली आहे. जळगावात 24 कॅरेट सोन्याचा दर 58 हजारांच्याही पुढे गेला आहे.
आजचे 24 व 22 कॅरेट सोन्याचे दर
अमरावती – 24 कॅरेट 56,600 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट -52,990 रुपये 10 ग्रॅम तर चांदी 69,000 रुपये प्रतिकिलो
सोलापूर – 24 कॅरेट 56,834 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट -52,096 रुपये 10 ग्रॅम तर चांदी 67,977 रुपये प्रतिकिलो
वर्धा – 24 कॅरेट 56,490 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट -53,310 रुपये 10 ग्रॅम तर चांदी 68,180 रुपये प्रतिकिलो
मुंबई – 24 कॅरेट 53,400 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट -45,400 रुपये 10 ग्रॅम
नागपूर – 24 कॅरेट 56,900 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट -54,100 रुपये 10 ग्रॅम तर चांदी 69,400 रुपये प्रतिकिलो
सांगली – 24 कॅरेट 56,900 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट -52,580 रुपये 10 ग्रॅम तर चांदी 69,000 रुपये प्रतिकिलो
Web Title :- Gold-Silver Rate Today | gold and silver rate check 19 jan rate today
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Swapnil Joshi | स्वप्निल जोशीच्या ‘त्या’ ट्वीटवर रितेश आणि जिनिलीयाने दिला मराठीत रिप्लाय; म्हणाले – ‘तुमच्या शुभेच्छांसाठी…’
- Ved Movie | ‘वेड’ चित्रपट आता नव्या रुपात; चित्रपटामध्ये करण्यात आले ‘हे’ बदल
- Maharashtra Politics | ‘मागची २५ वर्षे ज्यांनी मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम केलं तेच आज…; शिंदे गटाची ठाकरे गटावर सडकून टीका