Gold-Silver Rate Today | कोरोना काळातील उच्चांकी दराजवळ पोहोचले सोने, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात सोन्याच्या दराने (Gold-Silver Rate Today) उच्चांकी दर गाठला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली. मात्र, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold-Silver Rate Today) वाढ होताना पाहायला मिळत आहे. आज सोन्याचा दर 56 हजार 071 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आज भारतीय वायदे बाजारात (Indian Futures Market) सोन्याची किंमत 56 हजारांवर गेली आहे. कोरोना काळाच्या काळात सोन्याचे दर (Gold-Silver Rate Today) 56 हजार 200 रुपयांवर गेले होते. त्या रेकॉर्डपासून सोने केवळ 129 रुपये दूर आहे. सोन्याच्या दरात वाढ होत असताना चांदीच्या दरात देखील वाढ होत आहे. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सोन्याचा दर 0.59 टक्क्यांनी वाढाला आहे. तर चांदीचा दर 0.62 टक्क्यांनी वाढला आहे.

फ्युचर्स मार्केटमध्ये (Futures Market) 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर सकाळी 9.30 पर्यत 328 रुपयांनी वाढून 56 हजार 071 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. आज सोन्याचा दर 55,800 रुपयांवर उघडला. गेल्या ट्रेडिंग सत्रात MCX वर सोन्याचा दर 440 रुपयांनी वाढून 55,730 रुपयांवर बंद झाला होता.

MCX वर आज चांदीच्या दरात 4311 रुपयांनी वाढ झाली आहे.
आजचा चांदीचा दर 69,586 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
मागील ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर चांदीचा भाव 1100 रुपयांनी वाढून 69,178 रुपयांवर बंद झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे आणि चांदीचे दर वाढले आहेत.
सोन्याचा दर आज 0.63 टक्क्यांनी वाढून 1,877.59 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.
तर चांदीचा भाव 0.62 टक्क्यांनी वाढून 23.98 डॉलर प्रति औंसवर गेला आहे.

Web Title :- Gold-Silver Rate Today | gold price today what was feared will happen gold a few rupees below corona era highs know the rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mallika Sherawat | मल्लिकाने अंदमान येथील ‘ताज’ हॉटेलमधील बोल्ड फोटो केले शेअर; चाहते झाले घायाळ

Aadhaar Card Security | आधार धारकांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ टिप्स फॉलो करून आधार डाटा ठेवा सुरक्षित, जाणून घ्या डिटेल्स

Pune Crime News | ‘चिक्या’ भाईला शिव्या दिल्याच्या कारणावरुन दोघा युवकांवर चाकूने वार; जीवे मारण्याचा प्रयत्न