Gold-Silver Rate Today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold-Silver Rate Today | भारतीय लोक सण, उत्सव समारंभाच्या प्रसंगी सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी करतात. याशिवाय गुंतवणूक म्हणूनही सोनं चांदीचा विचार केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीचे दर रोज बदलत असतात. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या दरात (Gold-Silver Rate Today) घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 370 रुपये तर चांदीच्या दरात 860 रुपयांनी घसरण झाली आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह इतर शहरात सोने चांदी स्वस्त झाले आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटवर 24 कॅरेट सोन्याचा दर 370 रुपयांनी कमी होऊन 55 हजार 400 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 50 हजार 783 रुपयांवर व्यवहार करत असल्याने आज ग्राहकांना सोनं खरेदीसाठी चांगली संधी आहे.

सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही घट (Gold-Silver Rate Today) झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 63 हजार 740 रुपये प्रति किलो असून आज चांदीच्या दरात 860 रुपयांची घसरण झाली आहे. लग्नसराईत सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिसाला मिळाला आहे. सोन्या चांदीशिवाय जस्त, शिसे, तांबे या मौल्यवान वस्तूंच्या किंमतीत घट झालेली आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही.
सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा (22 Carat Gold) वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.
ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे
माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5
प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

Web Title :-  Gold-Silver Rate Today | gold rate today gold and silver price is on 27th february 2023 silver and gold rate slightly down

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raigad Crime News | पोलादपूरमध्ये 55 वर्षीय व्यक्तीची नैराश्याच्या भरात आत्महत्या

Pune Crime News | एक्स्ट्रा चार्जेस कमी करुन घेणे पडले महागात; टीम व्हिव्हर अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून केली फसवणूक

Ranbir Kapoor | रणबीर कपूर सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये नाही तर ‘या’ दिग्गज गायकाच्या बायोपिक मध्ये झळकणार; अभिनेत्याने केला खुलासा