Gold-Silver Rate Today | दिवाळी सणात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय, जाणून घ्या आजचा भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold-Silver Rate Today | दिवाळीला (Diwali Festival) सुरुवात झाली आहे. दिवाळी म्हटलं, की नवीन वस्तू, सोने-चांदी खरेदीकडे कल असतो. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बहुतांश जण सोने खरेदिला प्राधान्य देतात. त्यामुळे सराफा बाजारात सोने-चांदी खेरेदीसाठी (Gold-Silver Rate Today) नागरिकांची गर्दी होताना पहायला मिळत आहे. मात्र सोन्याच्या भावात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान मागील आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावातही घसरण होताना दिसली, आता 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपये आहे.

 

आजचा सोने-चांदीचा भाव

आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची (Gold-Silver Rate Today) किंमत 47 हजार रुपये असून मागील ट्रेडमध्ये याची किंमत 46,250 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स (Good Returns) या वेबसाईट नुसार चांदी 57 हजार 700 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 56 हजार 150 रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क (Excise Duty), राज्य कर (State Tax) आणि मेकिंग शुल्कामुळे (Making Charges) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमतीत भारभर बदलत असतात.

 

तुमच्या शहरातील आजचे सोने-चांदीचे दर

मुंबई – 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47000 हजार तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,280 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुणे – 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,030 हजार तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

नागपूर – 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,030 हजार तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

नाशिक – 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,030 हजार तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा आजचा प्रति 10 ग्रॅमचा दर 577 रुपये आहे.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर (Gold Price Today) घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

 

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने (24 Carat Gold) सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही.
सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते.
जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की,
22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

 

 

Web Title :- Gold-Silver Rate Today | gold silver price 23 october 2022 on mumbai pune new rates maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा