Gold-Silver Rate Today | सोन्याची विक्रमी दराच्या दिशेने वाटचाल, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विक्रमी पातळीवर जाणाऱ्या सोन्याच्या दरवाढीला (Gold-Silver Rate Today) काल ब्रेक लागला. पण, आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. तसेच कालच्या घसरणीतून सावरल्यानंतर आज चांदीच्या दरात देखील वाढ होताना पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दराची 56,200 रुपयांच्या उच्चांकाकडे (Gold-Silver Rate Today) वाटचाल सुरु असून आज (शुक्रवार) MCX वर सोन्याचा भाव 0.31 टक्के वाढला आहे तर चांदी 0.37 टक्क्यांच्या मजबूतीसह व्यवहार करत आहे.

आज फ्युचर्स मार्केटमध्ये (Futures Market) 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर (Gold-Silver Rate Today) कालच्या बंद किंमतीपासून सकाळी 9.15 पर्यंत 31 रुपयांनी वाढून 55,321 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. आज सोन्याचा भाव 55,382 रुपयांवर उघडला. गेल्या ट्रेडिंग सत्रात MCX वर सोन्याचा भाव 500 रुपयांनी घसरून 55,267 रुपयांवर बंद झाला होता. तर गुरुवारी सोन्याचा दर 0.95 टक्क्यांनी घसरला. त्याचवेळी चांदीचा दरही 1.68 टक्क्यांनी घसरून बंद झाला.

एमसीएक्स वर आज चांदीचा दर 251 रुपयांनी वाढून 68,329 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. आज चांदीचा दर 68,389 रुपयांवर उघडला. मागील ट्रेडिंग सत्रात चांदीच्या दरात 1168 रुपांची घसरण होऊन 68,150 रुपयांवर बंद झाला.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही.
सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा (22 Carat Gold) वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.
ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे
माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

Web Title :- Gold-Silver Rate Today | gold silver price today latest update on 6 january 2023 yellow metal records hike

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पोलीस शिपायाचा परस्पर कारनामा; लोहमार्ग उपअधीक्षकाच्या नावाने परस्पर मागितले सीसीटीव्ही फुटेज

Jitendra Awhad | मुंबईतील भांडूपमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी