2 दिवसांनंतर पुन्हा ‘सोन्या-चांदी’च्या किंमतीत झाला बदल, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : चीनमधील कोरोना विषाणूचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करणे सुरू केली आहे. यामुळे देशांतर्गत स्तरावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर दिल्लीत १० ग्रॅम सोन्याचे दर किरकोळ ७८ रुपयांनी वाढून ४३,५१३ रुपये झाले आहेत. यापूर्वी दोन दिवसांत १० ग्रॅम सोन्याचे दर १००० रुपयांनी स्वस्त झाले होते.

सोन्याची नवीन किंमत (Gold Price on 27th February 2020) –

दिल्लीमधील सराफा बाजारात गुरुवारी ९९.९ टक्के शुद्धतेसह १० ग्रॅम सोन्याची किंमत ४३,४३५ रुपयांनी वाढून ४३,५१३ रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे. त्याचवेळी बुधवारी दिल्लीत सोन्याचा भाव ४३,५०२ रुपये प्रति १० ग्रॅम वर आला होता. मंगळवारी सोने ४३,५६४ रुपये प्रति १० ग्रॅमच्या किमतीने बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने १,६४९ प्रति औंस तर चांदी १८.०५ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर होते.

चांदीची नवीन किंमत (Silver Rate on 27th February 2020) –

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीत देखील किरकोळ प्रमाणात वाढ दिसून आली. गुरुवारी १ किलोग्रॅम चांदीचा दर ३५ रुपयांनी वाढून ४८,१३० रुपयांवर पोहोचला. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर घसरून ४८,१४६ रुपये प्रति किलोग्रॅम वर आला. मंगळवारी चांदी ४८,९७४ रुपये प्रति किलोग्रॅम च्या किमतीत बंद झाले.

आता पुढे काय –

HDFC सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांचे म्हणणे आहे की सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच ते म्हणाले किंमती अजून जास्त वाढण्याची शक्यता कमी आहे.

केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, जर कोणी गुंतवणूक केली असेल तर त्याने नफा वसूल करून घ्यावा आणि सोन्याऐवजी चांदीमधून देखील जलद पैसे कमविण्याची संधी मिळू शकेल. कारण सोने-चांदीचे प्रमाण सध्या वाढले आहे.

जर सोप्या शब्दात सांगायचे झाले तर सोन्या-चांदीच्या किंमतींचे प्रमाण २०१० मध्ये खालच्या स्तराला गेल्यापासून नंतर सतत वाढते राहिले आहे. सध्या हे प्रमाण ८६ पेक्षा अधिक आहे. अजय केडिया सांगतात की जेव्हा सोन्या-चांदीच्या किंमतींचे प्रमाण वाढते तेव्हा ते भविष्यातील भावी संकटाची चाहूल दर्शवत असते.

जर सर्वसाधारणपणे हे प्रमाण ८० च्या वर असेल तर ते अधिक मानले जाते आणि यावेळी मागील एका वर्षाची सरासरी ८२ पेक्षा जास्त आहे. हे प्रमाण दर्शवते की एका औंस सोन्यापासून किती औंस चांदी खरेदी करता येईल. म्हणूनच हे प्रमाण जितके जास्त असेल तितकी सोन्याची किंमत अधिक असते आणि हे प्रमाण कमी असणे म्हणजे चांदी अधिक मजबूत होत आहे.

तसेच त्यांचे म्हणणे आहे की सोन्या-चांदीच्या किमतीतील गुणोत्तर (सोन्याचे-चांदीचे वाढलेले प्रमाण) हे जास्त काळ टिकणार नाही. तर सोन्याच्या किंमती पुन्हा घसरतील असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. त्यामुळे आपण जर एखाद्या मोठ्या आपत्कालीन परिस्थितीतून जात नसाल तर सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करत राहावी.

You might also like